‘‘विवाहाचा निर्णय घेताना प्रत्येक क्षणी सदसद्विवेकबुद्धी वापरा. बऱ्याचदा आई-वडील जोडीदार शोधण्याची जबाबदारी घेतात, आपणही ती घेवू देतो, नंतर काही वाईट घडले तर जबाबदारीचे खापर त्यांच्यावर फोडता येते, म्हणून. त्यापेक्षा स्वत:चा जोडीदार शोधण्याची जबाबदारी स्वत: घेतली पाहिजे. त्यासाठी स्वत:शी ठाम, प्रामाणिक आणि आíथकदृष्टय़ा स्वावलंबी असणे गरजेचे आहे. स्वत:चे अग्रक्रम ठरवा, स्वत:च्या स्वभावाचे सकारात्मक आणि नकारात्मक पलू समजून घ्या.’’ असे प्रतिपादन निरामय ट्रस्ट, सावंतवाडीच्या संस्थापक संचालक वंदना करंबेळकर यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने विद्याíथनींसाठी ‘विवाहपूर्व मार्गदशन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी मार्गदर्शनाच्या पहिल्या सत्रात लग्न ही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही, असे स्पष्ट केले. तसेच मुलींना जोडीदार निवडीच्या विविध टप्प्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. विविध कौशल्ये येणे, शिक्षण पूर्ण करणे, करिअरचा विचार करणे या बाबी लग्नाआधी प्राधान्यक्रमाने विचारात घेणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात काय प्रतिमा आहे, ते तपासून पाहा, पत्रिकेतील न कळणाऱ्या भाषेपेक्षा, स्वत:ला समजणारया भाषेत आपल्या व जोडीदाराच्या अपेक्षा समजून घ्या, असे आवाहन त्यांनी मुलींना केले. जोडीदाराचे शिक्षण, आíथक परिस्थिती, जबाबदारी घेण्याची कुवत, तुमच्या अपेक्षा, त्याच्या अपेक्षा, पालकांशी संवाद, लग्नानंतर अपेक्षित कौटुंबिक जबाबदाऱ्या, जोडीदाराशी भेटण्यापूर्वी संवाद, सुरक्षित अंतर, स्वत:च्या विशेष आवडी, छंद, पालकांचा अहंगंड, अशा अनेक मुद्दय़ांचा वंदना करंबेळकर यांनी पहिल्या सत्रामध्ये सविस्तर परामर्श घेतला.  जागतिक महिला दिनानिमित्त अशी आगळीवेगळी कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश, कार्यशाळेची संकल्पना, महिला विकास कक्षाचे कार्य, कार्यशाळेची रूपरेषा कक्षाच्या समन्वयक प्रा. सुमेधा नाईक स्पष्ट केली. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थिनींनी विवाह, जोडीदार निवड, घरच्यांची संमती, प्रेमविवाह, जोडीदाराचा स्वभाव कसा ओळखावा, संवाद कसा साधावा, लग्न न केल्यास काय समस्या येऊ शकतात, इत्यादी संदर्भात विविध प्रश्न विचारले. वंदना करंबेळकर यांनी मुलींच्या सर्व शंकांना सविस्तर उत्तरे दिली. तसेच प्रा. सुमेधा नाईक यांनी मुलींना विविध सत्य उदाहरणे आणि संवाद साधण्याचे व्यावहारिक मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थिनींनी आपले अनुभव व्यक्त केले. घरात या विषयावर संवाद साधताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. काही विद्याíथनींनी, या कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे करिअर, लग्न, जबाबदारी या कल्पना स्पष्ट झाल्या. यापुढे आम्हाला याबाबत विचार किंवा चर्चा करायला आवडेल, अशी मते मांडली. स्वत:च्या जबाबदारीवर लग्न करायचे असेल तर आत्मविश्वास वाढवायला हवा याची जाणीव आम्हाला या कार्यशाळेतून मिळाली, असे मत एका विद्याíथनीने मांडले. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील ५१ विद्याíथनी सहभागी झाल्या. प्रथमवर्ष वाणिज्य विभागाच्या अंकिता भगतने सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन मयुरी कांबळी हिने केले. रविवार सुट्टीचा दिवस असूनदेखील तीन सत्रांमध्ये संपन्न झालेल्या या विवाहपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेतील विद्याíथनींची उपस्थिती व सहभाग लक्षणीय होता.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात