अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दोन माजी आमदारांनी वचिंत बहुजन आघाडी पक्षाला राजीनामा दिला असून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.

बुधवारी निसर्ग चक्रीवादळाला मंबईत लढा देत असताना सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेवून अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती.

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Mohite-Patil, Madha, Mohite-Patil Madha,
माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल माध्यमांवरून दिली.

या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले जातेय. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाबाबत माहिती मिळाल्यामुळेच ३१ मे रोजी वंचित बहुजन आघाडीतील वादासंदर्भात कार्यकर्त्यांवर कारवाईचा बगडा उभारणारे पत्र काढण्याची आल्याची चर्चा आहे.