काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा भाजपा प्रवेश सुरू आहे. हा ओघ असाच सुरू राहिल्यास भविष्यात भाजपाचाही काँग्रेस होण्याची शक्यता आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.

पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी शनिवारी नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात रासपची ताकद वाढत आहे. सध्या विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही अशी टीका त्यांनी केली. रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपनगराध्यक्ष, २ आमदार आहेत. त्यामुळे पक्षाने भाजपाकडे ५७ जागांची मागणी केल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
congress odisha
Loksabha Election 2024 : काँग्रेसच्या यादीमुळे ओडिशात दोन भाऊ ‘आमने-सामने’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी १२० कोटीचे होते. आता ते ७ हजार ५०० कोटींवर गेले आहे. विदर्भातील दूध उत्पादन दहा हजार लिटरवरून साडेचार लाखांवर गेले आहे. केंद्रातही स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग निर्माण करण्यात आला. याचा विचार करता आम्हाला पुन्हा पाच वर्ष संधी मिळेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या मेळाव्यात शक्तिप्रदर्शन
२५ ऑगस्टला मुंबईत रासपचा वर्धापन दिन आहे. त्यात सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होतील असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.