News Flash

‘विवेकानंदांचा पुतळा हे एकात्मतेचे चांगले दर्शन’

विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने लोकसहभागातून उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सरकार्यवाह सुरेश

| March 15, 2014 01:35 am

विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने लोकसहभागातून उभारलेला स्वामी विवेकानंदांचा पुतळा हे सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सरकार्यवाह सुरेश सदाशिव उपाख्य, भैयाजी जोशी यांनी केले.
भयाजी जोशी लातूर दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी लोकसहभागातून उभारल्या गेलेल्या स्वामी विवेकानंद पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे विभाग संघचालक डॉ. अशोक कुकडे, डॉ. राजेश पाटील आदी उपस्थित होते. भयाजी जोशी यांनी कन्याकुमारीनंतर लातुरात लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पात योगदान दिलेल्या सर्वाचे कौतुक केले. कन्याकुमारीतील प्रकल्प देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. शहरातील हा प्रकल्प सामाजिक संस्थांचे एकात्मतेचे चांगले दर्शन आहे. या आगळय़ावेगळय़ा कामातून माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळत राहील. अनेकांना मार्गदर्शक ठरणारे हे काम आहे,  असे ते म्हणाले. संस्थेचे अॅड. संजय पांडे यांनी स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:35 am

Web Title: vivekananda statue is vision of integrity
Next Stories
1 रामेश्वर रुईमध्ये उद्यापासून राज्य महा-वीर कुस्ती स्पर्धा
2 नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी नेत्यांसह संघटना सरसावल्या
3 ५६५ ग्रामपंचायती ऑनलाईन, ९० दिवसांत ३५ हजार प्रमाणपत्रे!
Just Now!
X