सेवाग्राम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने अतिरिक्त सोय म्हणून सावंगीच्या विनोबा भावे रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील ४५ निवासी डॉक्टरांना शासनाच्या विनंतीवरून आज मुंबईस पाठविण्यात आले. क्षमता कमी होत असल्याने कोविड रुग्णालय असलेल्या सेवाग्राम सोबतच काही जबाबदारी जिल्ह्यातील अन्य वैद्यकीय महाविद्यालयस सोपविण्याची विनंती अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे यांनी शासनाकडे यापूर्वी केली होती. त्याची दखल घेत आज जिल्हाधिकारी विवेक भीमनवर यांनी सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून तयारी करण्याचे निर्देश दिले.

तसेच या रुग्णालयात ३०० बेडची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. मेघे अभिमत विद्यापीठाच्या या रुग्णालयात सर्व सोयी असण्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ तयारी ठेवली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील पाहिले दोन्ही रुग्ण प्रथम इथेच दाखल झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाचे मुख्याधिकारी उदय मेघे म्हणाले, “आम्ही तपासणीसाठी सिद्ध आहोतच तसेच करोना चाचणी प्रयोगशाळा म्हणून काहीच दिवसात मान्यता मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे रुग्णाची प्राथमिक तपासणी इथेच करणे शक्य होईल.”