जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह होत असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात चारा डेपो, चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. मारुती कारकर, तालुकाध्यक्ष अॅड अजित खोत, अॅड. जयंत फस्के, अॅड. डी. एन. सोनवणे, केरबा गाढवे, डॉ. भजनदास कावळे, अर्जुन वाकळे आदी पदाधिकारी, कार्यकत्रे सहभागी झाले होते. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी टंचाई आढावा बठकीत चाराटंचाई लक्षात घेऊन अद्यापि कसलीही कार्यवाही सुरू करण्यात आली नसल्याची माहिती दिली होती. राज्य स्तरावर जिल्हानिहाय माहिती घेऊन चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी बठकीत दिली. परंतु जिल्ह्यात सध्या जनावरे जगविणे पशुपालकांना किती अवघड झाले आहे, याची जाणीव त्यांना नाही, असा आरोप करीत चारा डेपो, चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. तत्काळ चारा छावण्या सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा अॅड. खोत यांनी दिला. जिल्हाध्यक्ष कारकर, केरबा गाढवे आदींसह शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.