25 October 2020

News Flash

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच!-अशोक चव्हाण

काँग्रेसकडून पुन्हा एकदा खडसेंना पक्षात येण्याची ऑफर

अशोक चव्हाण (संग्रहित छायाचित्र )

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एकप्रकारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफरच दिली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही खडसेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपशी मी निष्ठावान आहे, ४० वर्षे या पक्षासाठी काम केले आहे. असे उत्तर खडसे यांनी त्यावेळी यशोमती ठाकूर यांना दिले होते.

पुण्यातल्या भोसरी एमआयडीसीच्या जमीन खरेदी व्यवहारात खडसे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. ते नाराज आहेत, त्यांची घुसमट होते आहे हे त्यांच्या वक्तव्यांमधून वारंवार समोर आलेच आहे. अशात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच काँग्रेसमध्ये खडसे आले तर त्यांचे स्वागत करू म्हणत त्यांना ऑफर दिली आहे. याबाबत एकनाथ खडसे काय निर्णय घेणार हे अद्याप ठरलेले नाही. तरीही राजकीय वर्तुळात अशोक चव्हाणांनी खडसेंना दिलेल्या ऑफरचीच चर्चा रंगली आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे वकव्य केले आहे. मागील आठवड्यात जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्या चर्चेचा धुरळा खाली बसत नाही तोच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या या ऑफरची चर्चा रंगली आहे

याच पत्रकार परिषदेत नारायण राणेंबाबत विचारले असता जे लोक आमचा पक्ष सोडून गेले आहेत त्यांचा विचार कशाला करायचा असे म्हणत चव्हाणांनी या प्रश्नाला सोयीस्कर बगल दिली आहे. मात्र भाजपमधले नाराज आमच्याकडे आले तर आम्ही स्वागतच करू असे म्हणत खडसेंना ऑफरच दिली आहे. आता याबाबत एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 10:40 pm

Web Title: we welcome eknath khadse in congress says ashok chavan
टॅग Ashok Chavan
Next Stories
1 भीमा कोरेगावच्या घटनेचे मराठवाड्यात पडसाद, आंबेडकरी संघटनांनी नोंदवला निषेध
2 मुंबईमध्ये रंगणार ‘माणदेशी महोत्सव’
3 सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
Just Now!
X