देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे हळूहळू वाहू लागले आहेत. अनेक पक्ष एकमेकांशी वाटाघाटी करत युती आणि गटबंधनांची बेरीज वजाबाकी करताना दिसत आहेत. एकीकडे राष्ट्रीय स्तरावर हे चित्र असतानाच दुसरीकडे राज्यातही पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकींची पूर्वतयारी जवळजवळ वर्षभर आधीच सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. यावरूनच आता ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या पक्षांचे सोशल मिडीया टीम्स सक्रीय झाल्या आहेत. एकीकडे कार्यकर्ते ऑफलाइन आंदोलने आणि मोर्चे काढत असतानाच दुसरीकडे डिजीटल फ्रण्टवरही राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा व शिवसेनेच्या तू तू मैं मैं वर टिका करतानाचा असाच एक व्हिडीओ राष्ट्रावादी काँग्रेसने ट्विट केला आहे.

शिवसेना आणि भाजपाची आगामी निवडणुकींसाठी युती होणार का याबद्दल अद्याप कोणतीही औपचारिक माहिती दोन्ही पक्षांनी दिलेली नाही. त्यामुळेच दिल्लीतील नेते आणि राज्यातील नेत्यांच्या वक्त्यवांमध्ये तफावत अढळत आहे. यावरुन राष्ट्रवादीने या ट्विटमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्र्यांची पुन्हा स्वबळाची भाषा, मात्र पक्षाध्यक्ष शहा म्हणतात शिवसेना सोबत हवी’ अशा ओळी पोस्ट करत राष्ट्रवादीने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

राष्ट्रावादीने ट्विट केलेल्या या व्हिडीओसाठी झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेचे शिर्षकगीत पार्श्वसंगीत म्हणून वापरण्यात आले आहे. राष्ट्रवादीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांचे व्हिडीओ क्लिप एकत्र करुन हा व्हिडीओ तयार केला आहे. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी अनेकदा वेगवगेळ्या मंचांवरुन एकमेकांच्या पक्षांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या व्हिडीओजचे कोलाज करुन राष्ट्रवादीने, ‘शिवसेना- भाजपा तुझं माझं ब्रेकअप म्हणणार का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

या व्हिडीओमध्ये शिवसेना आणि भाजपाचे हे नाते किती दिवस टिकणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. हे नातं टिकणार की सेना भाजपाचं ब्रेकअप होणार असाही सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

या व्हिडीओसाठी ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेचे शिर्षकगीत वापरले आहे. या गाण्यात्.ा व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेले शब्द खालीलप्रमाणे

आधी हा न्यायाचा ढगांच्या थेटवर
आता त्या रोडवरती खड्डे

आधी हि मागे मागे फिरायची
आता मी करतो हांजी हांजी

आधी हा कस्मे नी वादे घ्यायचा
आता न देई साधा वेळ

आधी लपाछपी Romantic असायची
आता हा तारेवरचा खेळ

पुरे झाला झूठमूठ हसण्याचा Makeup
तुझ माझ Breakup Breakup
तुझ माझ Breakup Breakup

Seriously…
तुझ माझ Breakup Breakup
तुझ माझ Breakup Breakup

त्यामुळे आता भाजपा आणि शिवसेनेचे ब्रेकअप होते की पुन्हा एकदा ते युती करतात याकडे राष्ट्रवादीबरोबरच अनेक कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिलेले आहे.