News Flash

पोलीस ठाण्यातच पोलिसाकडून महिला पोलिसाचा विनयभंग

पोलीस ठाण्यातच एका पोलीस शिपायाने महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोलापुरात घडली.

प्रतिनिधिक छायाचित्र

पोलीस ठाण्यातच एका पोलीस शिपायाने महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना सोलापुरात घडली. संबंधित पोलीस शिपायावर गुन्हा दाखल झाला आहे.

अभिजित यल्लादास वामने असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री हा विनयभंगाचा प्रकार घडला. पीडित महिला पोलीस शिपायाने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्हय़ाची माहिती अशी, की यातील पीडित महिला पोलीस शिपाई ही विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर पोलीस शिपाई अभिजित वामने हादेखील याच पोलीस ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत आहे.

रात्री पीडित महिला पोलीस शिपाई ही पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असताना पतीने आणलेला जेवणाचा डबा घेण्यासाठी ती ठाणे अंमलदाराच्या खोलीतून बाहेर जात होती. त्या वेळी ओळखीचा पोलीस शिपाई अभिजित वामने हा पोलीस ठाण्याच्या बाहेरील व्हरांडय़ात तिच्यासमोर येऊन गाणे म्हणू लागला. त्याने वाईट नजरेने दोन्ही हात वर करून पीडित महिला पोलीस शिपायाच्या अंगावर पडण्याचा प्रयत्न केला व तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे तिला प्रचंड धक्का बसला. शेवटी तिने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:02 am

Web Title: women police molestation in police station itself
Next Stories
1 कर्जतमध्ये आगळे तुफान, श्रमदान करत पदवीधर विवाहबद्ध
2 विदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली
3 एसटी भाडेवाढीच्या उंबरठय़ावर
Just Now!
X