कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडला. खुर्शीद अन्सारी (वय ३०) असे त्याचे नाव आहे. अन्सारी हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. सध्या तो आर्य स्टील या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये काम करीत होता. तो राहायलाही याच परिसरात आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे तो कंपनीतील मशीनवर काम करीत होता. विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.