News Flash

यवतमाळमध्ये भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये राडा

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीदरम्यान गदारोळ झाला होता

यवतळमामध्ये बुधवारी पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा झाला आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये हाणामारी आणि धक्काबुकी झाल्याची चर्चाही आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीदरम्यान गदारोळ झाला होता. काही काळासाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना ४, भाजप २, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. येथे महाविकास आघाडी आणि भाजपा असा सामना रंगला. पण ऐनवेळी राष्ट्रवादीचा सदस्याने भाजपासोबत घरोबा केला. तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेतील एका महिलेला आपल्या पाठिंब्यासाठी तयार केले होते. बुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच राडा झाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ व रेटारेटी झाली.

राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भाजपवासी झाले. तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भाजपाच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान एबीपीच्या वृत्तानुसार, भाजपाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 3:41 pm

Web Title: yavatmal panchayat samiti election shiv sena bjp leaders dispute nck 90
Next Stories
1 तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका, भाजपाशी केली जवळीक
2 मनसेच्या नव्या झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध, राज ठाकरेंना दिला ‘हा’ इशारा
3 लेकीच्या पदस्पर्शानं कारची पूजा करणाऱ्या पित्यानं जिंकलं अशोक चव्हाणांचं मन
Just Now!
X