संघर्षात विजय मिळाला की बाळासाहेब ठाकरेंची आठवण नक्की येते. मला काहीतरी व्हायचं आहे हा विचार स्वप्नातही केला नव्हता. माझ्या आजोबांपासून जी परंपरा आहे तीच सांभाळण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आज सगळ्यांना धन्यवाद देतो आहे. सोनिया गांधी यांनाही धन्यवाद देतो आहे. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं तीस वर्षांपासून मैत्री असलेल्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र ज्यांच्याशी सामना केला त्या विरोधकांनी माझ्यावर विश्वास दर्शवला. सगळ्यांचेच मी आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले की आपण आखाड्यात पहिल्यांदा आलो आहोत. मी आखाड्यात पहिल्यांदा आलो असो तरीही आपण मैदानावरची माणसं आहोत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जो विचार करुन माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. हे शिवधनुष्य आहे. सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की हे माझं सरकार आहे.

सरकार स्थापन झाल्यावर मोठ्या भावाला भेटायलाही मी दिल्लीत भेटायला जाणार असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्र्याची खुर्ची म्हणजे काट्यांची असते जाणारा तिला आणखी खिळे लावून जातो. ते सगळे खिळे ठोकण्यासाठीचा हातोडा माझ्या हाती तुमच्या रुपाने आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दिलेला शब्द मी कधीही पडू देत नाही. खोट्याची साथ मी कधीही देणार नाही असं म्हणत त्यांनी भाजपाला सुनावलं.