पीळदार शरीरयष्टीच्या २०० तरुणांना वलयांकित नेत्यांच्या सुरक्षेचे काम

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

औरंगाबादेत अलीकडेच एका अभिनेत्रीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आयोजकांना नंतर त्या अभिनेत्रीभोवती सुरक्षाकवच तयार करण्यासाठी ‘बाऊन्सर’ना पाचारण करावे लागले. सुदृढ शरीरयष्टी बनवलेले तरुण ‘बाऊन्सर’ सध्याच्या निवडणूक वातावरणात वलयांकित नेत्यांच्या सभा, शोभायात्रा, मिरवणुकांमध्ये सुरक्षेचे कडे निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहेत.

औरंगाबादेत विविध व्यायामशाळांमध्ये (जीम) हजारांवर तरुण सुदृढ शरीरयष्टी तयार करण्याच्या कामात मेहनत घेत आहेत. त्यातही पीळदार शरीरयष्टी असणारे असे २०० तरुण बाऊन्सर म्हणून काम करत आहेत. सभा किंवा मेळाव्याच्या वेळी आयोजक व्यायामशाळांच्या प्रमुखांकडे किती व्यक्ती गरजेच्या आहेत याबाबत मागणी करतात. त्यानुसार त्यांना काम मिळते.

प्रशिक्षक आणि पूर्वी बाऊन्सर म्हणूनही काम केलेले महेश चिंतामणी म्हणाले, आतून-बाहेरून मजबूत शरीरयष्टी तयार करायची असेल तर त्यासाठी आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे.  उत्तम, सकस भाज्या, सुका मेव्यातील पदार्थ, तर मांसाहारातील दोनेक किलो चिकन, मासे, साधारण एक डझन अंडी, असा अडीचशे ते तीनशे रुपयांचा आहार दररोजच घ्यावा लागतो. व्यायामशाळेत (जीम) मेहनत, घामही तेवढाच गाळावा लागतो. चार-पाच वर्षांच्या मेहनतीनंतर पीळदार शरीर तयार होते. त्यात पुन्हा खंड फारसा चालत नाही. अशा शरीरयष्टीच्या तरुणांना ‘बाऊन्सर’ म्हणून ओळखले जाते. वलयांकित नेते, अभिनेते, अभिनेतत्री यांच्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षेसाठी म्हणून बाऊन्सर तरुणांना पाचारण केले जाते. एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचा पगार रोज त्यांना मिळतो. वर्षांतून ५० ते ६० दिवस काम मिळते. मात्र त्यावरच त्यांची गुजराण होऊ शकत नाही

नालासोपारा पोलीस ठाण्यातच हत्या

विरार : बहिणीने आत्महत्या केल्याच्या रागातून भावाने तिच्या पतीची सोमवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच चाकूने वार करून हत्या केली. नालासोपारा पश्चिमेच्या धनंजय नाका येथील मातृछाया इमारतीत राहणारा आकाश कोल्हेकर (२५)याची पत्नी कोमल (२०) हिने  रविवारी सकाळी  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या अंत्यसंस्कारासाठी  नातेवाईक साताऱ्याहून  आले होते. सोमवारी  नालासोपारा पोलिसांनी चारच्या सुमारास कोमलच्या पतीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते.  गुन्हे प्रकटीकरण कक्षात त्याची चौकशी सुरू होती. यावेळी कोमलचा भाऊ रवींद्र काळे हाही आला होता. पोलीस चौकशी करत असताना रवींद्रने आपल्या खिशातून चाकू काढून आकाशवर वार केले. पोलिसांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.  तेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी रवींद्र याला अटक केली आहे.