शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. याबाबत विविध तर्क आणि चर्चा समोर येत आहेत. अशात ही भेट का होऊ शकली नाही? याचं कारण आता समोर आलं आहे. उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर नव्हते त्यामुळे ही भेट होऊ शकली नाहीत. एवढंच नाही तर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करु नका असेही संभाजी भिडे यांना उद्धव ठाकरेंनी कळवलं आहे. संभाजी भिडे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मनोहर भिडे हे मातोश्रीवर आले होते, मात्र त्यांनी आधी काहीही कळवलं नव्हतं. तसंच भिडे गुरुजी जेव्हा मातोश्रीवर आले तेव्हा उद्धव ठाकरे घरी नव्हते. त्याचमुळे संभाजी भिडे यांची भेट होऊ शकली नाही असं शिवसेनेच्या मातोश्रीवरील प्रवक्त्यांनी एका वेबसाईटला सांगितलं आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे मातोश्री या ठिकाणी नव्हते त्यामुळे मातोश्रीवर त्यांना प्रवेश नाकारण्याचा प्रश्नच येत नाही असंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.