विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांचा पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे. पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत जाहीर करणार करणार असल्याचंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात.

गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याची चर्चा सुरु होती. तसंच गोपीचंद पडळकर भाजपामध्ये प्रवेश करत घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सांगलीमधील जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून पडळकर भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Confusion continued in Thane Lok Sabha seat the Mahayutis campaign stopped down due to candidate uncertainty
ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला
mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन

आणखी वाचा- वंचित हाती सत्ता द्या; धनगर आरक्षणाचा प्रश्न लगेच मिटेल

अद्याप भाजपा आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. युतीचा निर्णय झाल्यानंतर गोपीचंद पडळकरर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत निर्णय होणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना सांगली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपा, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सांगलीत झाली होती. सांगलीत भाजपाने संजयकाका पाटील, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. संजयकाका पाटील पाच लाख आठ हजार मतं मिळवत विजयी झाले होते.