राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन आठवडे झाल्यानंतरही सत्तेस्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकी मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु आहेत. किमान समान कार्यक्रमावर एकमत होण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राज्यातील प्रमुख पक्षांपैकी तीन पक्ष प्रयत्न करत असतानाच अचानक मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विटवर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहे. मात्र अनेकांना हा हॅशटॅग पटलेला नसून त्यावरुन टीका केली आहे. कलाकारांनी राजकारणात पडू नये असा सल्ला अनेकांनी कलाकारांना दिला आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार की मध्यवर्ती निवडणूक होणार यासंदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. त्याच आज अनेक मराठी कलाकारांनी केवळ #पुन्हानिवडणूक? इतकंच ट्विट केलं आहे. यामध्ये सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा समावेश आहे. काँग्रेसने भाजपा आयटी सेलच्या माध्यमातून मुद्दा कलाकारांच्या मदतीने पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भातील हा हॅशटॅग चालवला जात असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटवरुन याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. असं असलं तरी काँग्रेसने आक्षेप घेण्याआधीच नेटकऱ्यांनीच कलाकारांना सुनावले आहे.
कोण कोण या फालतू कलाकारांचे सिनेमे बगतील?
मी तर बगणार नाही #saveMaharastraForBjP#पुन्हानिवडणूक? pic.twitter.com/gDGGRNK8ug— Govind shejule patil (@govindshejule1) November 15, 2019
शिवसेना -राष्ट्रवादी – काँग्रेस युती होणार समजल्यावर #पुन्हानिवडणूक हा ट्रेंड भाजप आयटी सेल करत आहे.
समजलं का तुमचे आवडते कलाकार कसे influencer म्हणून काम करतात.
यामुळे खोटे मतप्रवाह तयार होतात याची जबाबदारी कोणाची?
उगाच डोक्यावर बसवू नका.#SaveMaharashtrafromBJP pic.twitter.com/aR0JBbkmbM— Sowmitra Desai (@dsowmitra) November 15, 2019
हे कलाकार आहेत का पक्षाचे एजंट?ह्यांना ह्यांची जागा दाखवून दया ह्यांचा यापुढे एकही सिनेमा पाहू नका.#पुन्हानिवडणूक pic.twitter.com/3yDVswRHZ8
— चेतन (@chetanNavale1) November 15, 2019
नरेंद्र मोदींच्या एका कॅम्पेनला पाठिंबा देण्यासाठी भारतातील काही खेळाडूंनी एक सारखेच ट्विट केले होते. सेना,काँग्रेस,राष्ट्रवादीचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम फायनल झाला असताना मराठी कलाकार #पुन्हानिवडणूक हा ट्रेंड कुणाच्या तरी सांगण्यावरून करत असेल का? शंका.#SaveMaharashtraFromBjp
— Kunal Adsule (@adsule_kunal) November 15, 2019
#पुन्हानिवडणूक – एक अंगाशी आलेलं मार्केटिंग कॅम्पेन?
— Bhushan (@BhushaanKadam) November 15, 2019
भाजपाची चाटुगिरी करु नका
महाराष्ट्राच्या जनतेला #पुन्हानिवडणुक नकोय!
काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सत्ता स्थापन करत असेल करुद्या त्यांना!
तुम्ही बोलले हे तुमचे वैयक्तिक मत आहेत
भाजपाने तुम्हाला विकत घेऊन #पुन्हानिवडणूक कार्यक्रम चालु केला काय? https://t.co/wPWu8qhgBi— sAcHiN DESHMUKH (@sAcHiN_Deshmuk) November 15, 2019
मराठी शेलिब्रिटींच नशीबच खराब आहे.#पुन्हानिवडणूक?
— टिपरे (@AAbaSpeaks) November 15, 2019
#पुन्हानिवडणूक किती पैसे मिळाले असतील?? भक्तांना 40 पैसे देतात सेलिब्रिटींना शंभर पट जास्त दिले तर चाळीस रुपये ?? @SaieTamhankar @meSonalee @SIDDHARTH23OCT @imAnkkush #भिकारीकलाकार pic.twitter.com/oEZqkdLnvQ
— Gajanan Gaikwad (@gajanangaikwad) November 15, 2019
#पुन्हानिवडणूक? असा #हॅशटॅग वापरणारे बरेचसे मराठी कलाकार भाजपला समर्पित झालेले लोक आहेत,असं समजायला पाहिजे.
— भगोडा स्वप्नील घिया (@SwapnilGhiya) November 15, 2019
ITCell वाले कमी पडलेत का काय म्हणून तुम्हा कलाकारांना #पुन्हानिवडणूक? हे Tweet करण्याची वेळ आली. एवढी काय भाकेले लागायची वेळ आली होती कि ४० पैसासाठी Tweet करण्याची वेळ आली.
— Ganesh Akhand (@ImAkhandGanesh) November 15, 2019
प्रमोशन सुरू झालं आहे का कलाकारांकडून MFK चं???? कलाकारांचे ट्विट तर तेच सांगत आहेत ह्या बद्दल खुलासा करावा कारण ट्रोलींग सुरू आहे भरपूर…#पुन्हानिवडणूक MFK साठीच वापरलं जात आहे का???? pic.twitter.com/uCTum90W1a
— आशय (@ashaysant) November 15, 2019
#पुन्हानिवडणूक यांचा बोलविता धनी कोण आहे? pic.twitter.com/FwJBvBWHgO
— Ashok Arunrao Pawar (@AshokArunrao) November 15, 2019
#पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग चालवणारे कलाकार निवडणुकांचा शासकीय खर्च उचलणार आहेत का?@meSonalee @SaieTamhankar @SIDDHARTH23OCT
— Shantanu Dhote (@DhoteShantanu) November 15, 2019
अत्ता @Twitter
उघडताच एक गोष्ट बघितलि सर्व मराठी कलाकार एक #HashTag #पुन्हानिवडणूक? करुन Tweet करत आहेत, आमदार विकत घेता आले नाहित म्हणून हा नवा प्रकार दिसतोय! @Saamanaonline— Shubham G. Varma (@sv178) November 15, 2019
@IAshishMete @maxleaker @ajaynirwal2 @AnuragANK
मराठी कलाकारांनी त्वरित सांगावं पुन्हानिवडणूक हा # का वापरला जात आहे, ही योग्य वेळ नाही हा # वापरायची.चुकीच्या गोष्टी पसरतायत ह्या मुळे.
कृपया सांगावे सध्या तरी हे Favourite कोण साठी आहे असं गृहीत धरावं का?@Brightstar_KC— आशय (@ashaysant) November 15, 2019
हे #पुन्हानिवडणुक नक्की काय आहे? मराठी कलाकरांसोबत वयक्तिक contact असलेल्यांनी ज्ञानार्जन करावे.
— पाटिल. (@RangerPaatil) November 15, 2019
अगोदर सिनेमा नाटकासाठी कलाकार भाड्याने मिळायचे आता ट्विट करायला पण भाड्याने मिळतात अजून किती चांगले दिवस पाहिजेत? #पुन्हानिवडणूक
— Rushikesh Waghmode (@RushiRushi07) November 15, 2019
नक्की वाचा >> कलाकारांचा ‘पुन्हा निवडणुकीचा सूर’; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
एकीकडून या कलाकारांवर टीकेचा भडीमार होत असला तरी हा हॅशटॅग म्हणजे धुरळा नावाच्या आगामी सिनेमाचे प्रमोशन असल्याचे समजते.