पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या चंदगड विधानसभा मतदार संघाच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी जाहीर केला आहे. कुपेकर यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर या निवडणूक लढवतील अशी अटकळ होती. कुपेकर यांनी या वेळी बाभुळकर यांनीही येथेच थांबावे असा सल्ला दिला आहे. मायलेकींनी निवडणुकीतून अंग काढून घेण्याच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन  निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक धक्का बसला आहे.

bjp leader sanjay kshirsagar to join sharad pawar ncp
मोहोळमध्ये भाजपचे असंतुष्ट नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार गटात, शरद पवारांच्या उपस्थितीत  होणार पक्षप्रवेश
Vasant More has many cars gold and silver
वसंत मोरे यांच्याकडे आहेत अनेक गाड्या, सोने आणि चांदी
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या कुपेकर या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची भूमिका ठरवण्यासाठी चंदगड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गडहिंग्लज येथे गुरुवारी सायंकाळी मेळावा आयोजित केला होता. या वेळी आमदार कुपेकर यांनी निवडणूक न लढण्याचा  निर्णय घेतला.

‘कार्यकर्ते आणि पक्षाच्या पाठबळावर सात वर्ष मी राजकारण केले आहे. आता माझी प्रकृती साथ देत नसल्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर माझी मुलगी डॉ. नंदा बाभुळकर हिनेही राजकारणात न पडता तिनेही थांबावे, असाही निर्णय मी घेतला आहे, असे त्या म्हणाल्या. आमदार कुपेकर यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले. कुपेकर कुटुंबीयांच्या या धक्कादायक निर्णयामुळे कार्यकर्ते दु:खी झाले. त्यांनाही अश्रू रोखता आले नाहीत. कुपेकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन  निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक धक्का बसला आहे. अगोदरच गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागोमाग एक आमदार रामराम ठोकत असताना आता त्यात आणखी एका आमदाराची भर पडली आहे. मध्यंतरी आमदार कुपेकर यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. परंतु त्यांनी राजकारणातूनच बाहेर पडण्याचा निर्णय आज घेतला.