महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन पक्षांसोबत मिळून सरकार बनवण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढतानाचे जुने व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्याबरोबर आघाडीची शक्यता फेटाळून लावताना ‘हलकट’ हे शब्द वापरले होते. तोच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

शिवसेनाप्रमुखांना त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले की, “राजकारणात शक्यता असते म्हणजे काय? हा हलकट माणसांचा खेळ असेल तर तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्ही सदगृहस्थ बनून राहणार की, हलकट बनणार. कोणी हलकट बनण्याचे ठरवेल असेल तरी मी हलकट माणसांबरोबर जाणार नाही”हे बाळासाहेबांचे त्यावेळचे उदगार होते.

Sharad pawar ajit pawar
शरद पवारांची भाजपाबरोबरची युती का रखडली? अजित पवारांनी सांगितली अंदर की बात; म्हणाले, “चर्चेकरता निघालो, पण…”
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

अटल बिहारी वाजपेयींचे सरकार पाडण्यासाठी जो माणूस जबाबदार आहे त्याच्याशी हातमिळवणी करणे कसे परवडेल? मी तरी अशा पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. शत्रू शत्रू असतो असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले होते. शरद पवारांनी जाहीरपणे माध्यमांना सांगितले की, सरकार पाडण्याची माझी जबाबदारी होती आणि मी ती पार पाडली. ते त्यात पारंगत आहेत. नुकसान या माणसामुळे झाले हे माहित आहे. लोकांचा विचार करा. ते सहन करतील ? असे बाळासाहेब त्या मुलाखतीत म्हणाले होते.