मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात १ जण ठार तर ५ जण जखमी झाले. ट्रेलरच्या धडकेने स्विफ्ट दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. जखमींपकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
कशेडी घाटात भोगाव येलंगेवाडी येथील वळणाच्या उतारावर ही घटना घडली. गोव्याकडून येणारा ट्रेलर (एमएच ०४ जीसी ४५२७) याची मुंबईकडून येणाऱ्या स्विफ्ट व्हीडीआय कार (क्र. एमएच १२ एचव्ही ६८४४) ला जोरदार धडक बसली. यानंतर दोन्ही वाहने बाजूला असलेला दगडी संरक्षक कठडा तोडून सुमारे २५-३० फूट खोल दरीमध्ये कोसळली.
या अपघातात राजकुमार ऊर्फ राजेन्द्र तुकाराम वराट (४८, रा.पाषाण, पुणे) हा डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा होऊन जागीच ठार झाला. या स्विफ्ट कारमधील विजय एकनाथ शहाणे (४६, नवी सांगवी, पुणे), सुशांत विजय शहाणे (१६), उषा विजय शहाणे (३८), कावेरी राजकुमार वराट (३५ रा. पाषाण, पुणे) आणि श्रावणी राजकुमार वराट (६) हे पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार करण्यात येऊन पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
या जखमींपकी उषा शहाणे या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे या वेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिन्मयी मिश्रा आणि डॉ. राजेश सलागरे यांनी सांगितले.
पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. टी. महाजन, नाना म्हात्रे, िपगळे, सावंत, गुनमान आणि गोडगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दरीतून ट्रेलर आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. या अपघातानंतर ट्रेलरचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अपघाताबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सावंत अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 dead 5 injured in kashedi ghat accident
First published on: 07-02-2016 at 01:44 IST