सांगली : विटा शहरातील यंत्रमागकामगारांना चालु वर्षी १२ टक्के बोनस देण्याचा निर्णय विटा यंत्रमाग संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.विटा शहर, औद्योगिक वसाहत व परीसरातील यंत्रमागकामगार, वहिफणीवाले ,जॅाबर्स, घडीवाले ,कांडीवाले अशा २००० कामगारांना सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांचे वितरण या माध्यमातुन होत आहे.

गेल्या काही वर्षापासुन जागतीकरण, केंद्र व राज्य शासनाची उदासीन धोरणे व कोरोना महामारीने वस्त्रोद्योग कमालीचा अडचणीत सापडला आहे.चार वर्षापासुन कापसाच्या व सुताच्या दरातील अस्थिरता व साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वीजेचे वाढलेले दर, परदेशातून करचुकवेगीरी करुन आयात होणारे कापड, नोटबंदी,जीएसटी, प्रादेशीक व सहकारी-खाजगी उद्योगांतील शासकिय भेदभाव यासारख्या कारणाने व राज्य व केंद्र शासनाची चुकीची धोरणे व दुर्लक्षामुळे सात्तत्याने अडचणीतुन सुरु आहे.चालु वर्षात कापुस व सुत दरातील सततच्या तेजीमंदीच्या खेळामुळे समस्त वस्त्रसाखळी अडचणीत सापडली आहे तर सततच्या नुकसाणीमुळे शहरातील जवळपास शेकडो यंत्रमाग भंगारमध्ये विकले गेले असतानाही आपल्या कामगारांना दिवाळी साजरी करता यावी या विचाराने सदर बोनस देण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>>सांगली: अवकाळी पावसाने दैना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, बाबुराव म्हेत्रे, वैभव म्हेत्रे, शिवाजी कलढोणे, शशीकांत तारळेकर, मिलिंद चोथे, राम तारळेकर, विवेक चोथे, अशोक रोकडे, विनोद तावरे, नितीन तारळेकर, कन्हैय्या शेंडे, विकास वाघमोडे, सुनिल लिपारे, डी. के. चोथे, राजधन चोथे यांच्यासह शहरातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.