लाडक्या बहीण योजनेमुळे केंद्रांना अनुदान मिळत नसल्याचा आरोप

रत्नागिरी – अनुदाना अभावी रत्नागिरी जिल्ह्यात उरलेली १२ शिवभोजन थाळी केंद्रे देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लाडकी बहिणी योजनेमुळे या केंद्रांचा निधी अडकल्याचा आरोप आता केंद्र चालकां कडून होवू लागला आहे.

राज्य शासनाकडून गरीब मजूर व  कामगारांची उपासमार टाळण्यासाठी  अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी कोरोना काळापासून सुरू केली. मात्र आता या शिवभोजन थाळी केंद्रांना टाळे लागण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २६ पैकी १४ केंद्रे आधीच बंद पडली आहेत. आता उरलेली १२ केंद्रांचा निधी थकल्याने ती ही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला असून, त्याचा फटका शिवभोजन बाळीला बसू लागला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील या १२ केंद्रांना गेल्या ४ महिन्यांचे अनुदान  न मिळाल्याने केंद्रचालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात दर दिवशी सरासरी १ हजार ४८० लाभार्थी या थाळीचा लाभ घेत असतात. या योजनेतर्गत २६ लाख २५ हजार अनुदान प्राप्त झाले आहे. शासनाकडून दहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात येवून  दहा रुपयांत पोटभर जेवण दिले जाते.

कोरोनाकाळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येत आहे. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे. जिल्ह्यातील २६ शिवभोजन केंद्रे मंजूर आहेत. त्यांना ३०५० थाळ्या  मंजूर आहेत. परंतु आता यातील १२ केंद्रेच सुरू आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्याने त्याचा मोठा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडत आहे. तो कमी करण्यासाठी कोरोनापासून सुरू असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याचे केंद्र चालकांकडून सांगितले जात आहे.