राज्यातील दुष्काळी गावांच्या यादीत शनिवारी १४२० गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. ही सर्व गावे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याशिवाय, पुढील आठ दिवसांत केंद्रीय पथकाकडून पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र सरकारच्या सुधारित नियमानुसार अपुऱ्या पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व गावांमध्ये दुष्काळासाठीच्या उपाययोजना आणि सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसूलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स सुरू करणे तसेच आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडीत न करणे अशा निर्णयांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1420 new villages added in drought affected villages list in maharashtra
First published on: 07-11-2015 at 17:22 IST