इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी १६०कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या दुधगंगा नळपाणी प्रकल्पास राज्याच्या नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे. इतकी मोठी रक्कम मिळणारी इचलकरंजी महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरलेली आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी दिली.

हेही वाचा- बच्चू कडू-राणा वादावरून सुषमा अंधारेंचे भाजपावर टीकास्र; म्हणाल्या,“बच्चू कडूंची कारकीर्द…”

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या रक्कम १६०.८४ कोटी रुपये प्रकल्प किंमतीच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या आकृतीबंधानुसार केंद्र शासनामार्फत ३३.३३ टक्के (५३.६१ कोटी रुपये), राज्य शासनामार्फत ३६.६७ टक्के ( ५८.९८ कोटी) व इचलकरंजी महानगरपालिकेचा हिस्सा ३० टक्के ४८.२५ कोटी अशी खर्च विभागणी आहे. याकामी इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत सत्वर निविदा प्रसिध्द करून काम चालू करणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत. २४ महिन्यात योजना पूर्ण करण्याच्या सूचना असून काम झाल्यानंतर इचलकरंजी शहरास सध्या भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी निघणार आहे.

हेही वाचा- अजित पवारांना ७० हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात बदनाम केले, जयंत पाटील यांचे मत

खासदारांची दुसरी भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नामुळे इचलकरंजी नगरपालिका कार्यक्षेत्र महापालिका रुपात विस्तारले होते. त्यांनी हे काम दिवाळीपूर्वी केले होते. इचलकरंजी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आता १६० कोटी रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेला मंजुरी मिळवून त्यांनी दिवाळीनंतर इचलकरंजीरांना दुसरी भेट दिली आहे.