अलिबाग :  गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून भालचंद्र म्हात्रे यास २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एन. के. मणेर यांनी सुनावली आहे. 

जानेवारी २०१७मध्ये हा गुन्हा अलिबाग तालुक्यातील शिरवली गावात घडला. २० वर्षीय पीडित मुलगी  गतिमंद आहे हे माहीत असताना आरोपीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. वारंवार झालेल्या लैंगिक संबंधांमुळे ती गरोदर राहिली. दरम्यान, ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात येताच तिने आरोपीविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात  दोषारोप पत्र दाखल केले.

शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी सरकार पक्षातर्फे  केलेला युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. सर्व साक्षीपुरावे आरोपीविरोधात सिद्ध झाल्याने आरोपीला दोषी ठरवून  २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये  दंड  ठोठावला आहे. अ‍ॅड. भूषण साळवी यांनी या खटल्यात १३ साक्षीदार  तपासले, त्यात फिर्यादी, स्वत: पीडित मुलगी आदींची साक्ष महत्त्वाची ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.