जत तालुक्यातील शेतक ऱ्याचा यशस्वी प्रयोग

सांगली : हापूसच्या चवीबरोबरच केसरचा गोडवा, पायरीचा रसाळपणा, मोहक रंगसंगतीने आर्किषत करणारा लालबाग, तोतापुरीसह देश-विदेशातील तब्बल २२ प्रकारचे आंबे एकाच झाडाला लगडल्याचे चित्र यंदा जत तालुक्यातील अंतराळ गावच्या काकासाहेब सावंत यांच्या शेतात पाहण्यास मिळाले. मूळचा नर्सरीचा व्यवसाय असलेल्या पुण्यातील नोकरी सोडून दुष्काळी भागात शेतीच्या प्रेमापोटी आलेल्या या तरुणाने हा नवा प्रयोग केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर देश-विदेशातील आंब्याच्या तब्बल ४४ वाणांचे कलम केले आहे. यापैकी २२ वाणांचे आंबे यंदाच्या हंगामात चाखण्यास मिळाले. यामध्ये केसर, हापूस, सिंधू , रत्ना, सोनपरी, नीलम, निरंजन, आम्रपाली, क्रोटोन, तैवान, लालबाग, दशेरी, राजापुरी, बेनिश, पायरी, बारोमाशी, वनराज, मलगोबा, मल्लिक्का, तोतापुरी अशा देशी आणि काही  विदेशी आंब्याच्या जाती समाविष्ट आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 varieties of mangoes per single tree akp
First published on: 18-06-2021 at 00:02 IST