नेवासे तालुक्यातील १९ गावांतील २७ बंधा-यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली आहे.
तालुक्यातील बुऱ्हाणपूर, कांगोणी, लोहगाव, वाकडी, माळीचिंचोरा, रांजणगाव देवी, देवसडे, चिलेखनवाडी, म्हसले या गावांत प्रत्येकी १ व भानसहिवरा येथे २ बंधारे मंजूर झाले आहेत. तसेच कायम टंचाईग्रस्त असणा-या शिंगवेतुकाई, महालक्ष्मी हिवरे येथे १ व राजेगाव, माका, कांगोणी, हिंगोणी, धनगरवाडी, लोहगाव या गावात २ बंधारे मंजूर झाले आहेत. यापैकी काही गावांत कालव्याचे पाणी जात नसल्याने तेथील गावक-यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. हे बंधारे मंजूर झाल्याने पाण्याची समस्या दूर होणार आहे. या सर्व बंधा-याची कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण होऊन त्यात पाणी साठवले जाईल, असे गडाख यांनी सांगितले.
मागील वर्षांत तालुक्यातील ३३२ बंधा-यांतील गाळ काढून त्यांची खोली वाढवण्यासाठी यशस्वी प्रयोग करण्यात आला. हे सर्व बंधारे उन्हाळय़ात पाण्याने भरले. त्यामुळे टँकर बंद होऊन सरकारचा त्यावरील मोठा खर्च वाचला आहे. शिवाय या गावांना शाश्वत पाणी मिळाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
नेवासे तालुक्यात २७ बंधारे मंजूर- आ. गडाख
नेवासे तालुक्यातील १९ गावांतील २७ बंधा-यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार शंकरराव गडाख यांनी ही माहिती दिली आहे.
First published on: 04-03-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 dams approved in nevasa taluka mla gadakh