महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. महाबळेश्वर येथे ३६५ मिमी तर लामज येथे ४१० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर झाड पडल्याने रात्री काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मांढरदेव-भोर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सातारा जिल्हय़ात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. माण, खटावसारख्या दुष्काळी भागात काही ठिकाणी झालेल्या पावसाने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील चोवीस तासांत महाबळेश्वर, पाचगणी, जावली, वाई आणि धरणांच्या पर्जन्य क्षेत्रांत जोरदार पाऊस राहिला. महाबळेश्वरातील मुसळधार पावसाने वेण्णालेकची पाणी पातळी पाच ते सहा फुटांनी वाढली आहे. तर महाबळेश्वरमध्येच ३६५.८ मिमी (एकूण ८४० मिमी), पाचगणी ३५.४ (१६६.३), तापोळा ३८८ (६९७.४), लामज ४१० (१०४५.३), जावली २२३.७, वाई ३६.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर सातारा ८४.६, कोरेगाव ६७.३, कराड २८.१, पाटण ७१, फलटण २०.४, माण ९.७, खटाव २८.३, खंडाळा ४८.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. मांढरदेव-वाई रस्त्यावर मांढरदेव घाटात काही भागांत डोंगराचा काही भाग कोसळला होता. परंतु त्वरित उपाययोजना करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिरजकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onवाईWai
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 365 mm rain in mahabaleshwar and 410 mm in lamaj
First published on: 23-06-2015 at 04:00 IST