चिपळूण वस्तुसंग्रहालयास ५० लाखांचे साहाय्य

रत्नागिरी :  महापुराचा मोठा फटका बसलेल्या चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वस्तुसंग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी राज्य शासनातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुरातन ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अमूल्य ठेवा पुराच्या पाण्यामुळे नष्ट झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध […]

२८ जुलै रोजी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केलेले वृत्त

रत्नागिरी :  महापुराचा मोठा फटका बसलेल्या चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वस्तुसंग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी राज्य शासनातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या पुरातन ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अमूल्य ठेवा पुराच्या पाण्यामुळे नष्ट झाला. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संग्रहालयाच्या फेरउभारणीसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. सामंत यांनी  नुकतीच वस्तुसंग्रहालयाला भेट देऊन झालेल्या हानीची पाहणी केली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 50 lakh assistance to chiplun museum heavy rain fall flood akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या