महाराष्ट्रात ५ हजार १३४ नवे करोना रुग्ण, २२४ नव्या मृ्त्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३ हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील २ लाख १७ हजार १२१ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६ टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ४५३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यात ८९ हजार २९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये ५ हजार १३४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार १२१ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांमधली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई -२३ हजार ३५९
ठाणे- २९ हजार ९८८
पुणे – १४ हजार ८९२
नाशिक-२३००
औरंगाबाद-३५०६
नागपूर-४५२

अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर मुंबईपेक्षा ठाण्यातील अॅक्टिव्ह केसेस वाढलेल्या दिसत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी १२ जुलैपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनचा किती परिणाम होतो ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

काय उपाय करा?

बाहेर पडताना मास्क लावा

गरज असेल तरच बाहेर पडा

बाहेरुन आल्यानंतर सॅनेटायझर वापरा

हात वारंवार स्वच्छ धुवा

ही सगळी आवाहनं महापालिकांकडून करण्यात आली आहेत. तसंच सरकार आणि प्रशासनाकडूनही हे वारंवार सांगण्यात आलं आहे. करोनाला घाबरु नका मात्र काळजी आवर्जून घ्या असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.