सांगलीच्या वाळवा तालुक्यात असलेल्या आश्रमशाळेतील ६ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. कुरपळ येथे असलेल्या मिनाई आश्रम याठिकाणी ही घटना घड़ली असून याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना अटक करण्यात आली आहे. अरविंद पवार असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकांचे नाव आहे. पवार यांनीच या सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पवार यांना या प्रकरणी मदत केल्याच्या संशयावरुन पोलिसांनी येथील मनिषा कांबळे या महिला शिपायाला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडे प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शाळेत ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ७० मुली राहतात. यातील ५ मुलींनी आपल्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार केली असून ३ मुलींनी विनयभंगाची तक्रार केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे उपअधिक्षक किशोर काळे यांनी सांगितले. अशाप्रकारे शाळेतच मुली सुरक्षित नसतील तर काय करायचे असा प्रश्न पालकांसमोर उभा राहीला आहे. या घटनेमुळे येथील पालक आणि विद्यार्थिनींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्ण चौकशी झाल्यानंतरच नक्की काय घडले ते समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 girls in sangli kurpal ashram shala sexually abuse by director
First published on: 26-09-2018 at 20:40 IST