मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुमारे ६७ हजार २०१ नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे. तर त्याच वेळी मयत व दुबार नोंदणी झालेल्या ७,७११ जणांची नावे यादीतून कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ाची मतदार संख्या ५९ हजार ४९०ने वाढून ती १२ लाखांवर जाईल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, मतदार नोंदणीमुळे तब्बल ६७ हजार तरुणांनी अमाप उत्साह दाखविल्याने प्रस्थापितांना आतापासून धडकी भरण्याची शक्यता आहे. कारण हे नव्या दमाचे नवमतदार आगामी निवडणुकीत कोणाच्या पारडय़ात आपले पहिलेवहिले मत टाकणार याचा अंदाज नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
१ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित रत्नागिरी जिल्ह्य़ात १६ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये १ जानेवारी २०१४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत व दुबार नोंद झालेल्यांची नावे कमी करणे, तसेच जुन्या यादीतील मतदाराचे नाव, वय, पत्ता आदींमध्ये बदल करणे आदींचा समावेश होता. जिल्हाधिकारी राजीव जाधव व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्ह्य़ातील जागरूक नागरिकांसह राजकीय पक्षांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. विशेषत: मतदार नोंदणीमध्ये तरुणांनी दाखविलेला अमाप उत्साह कौतुकास्पद असाच होता.
१७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्य़ात एकूण ११ लाख ४० हजार ९५९ मतदार असून त्यात आता ६७ हजार २०१ नवीन मतदारांची भर पडणार असून ही संख्या १२ लाख ०८ हजार एवढी होणार असली तरी त्यातून मयत व दुबार नोंदणी झालेल्या ७,७११ जणांची नावे कमी होणार असल्याने अंतिम यादीमध्ये १२ लाख ४४९ एवढे मतदार राहतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय स्थिती
दापोली विधानसभा मतदारसंघात दापोली, मंडणगड, खेड तालुक्यांचा समावेश असून एकूण १४ हजार ९३३ नवीन मतदारांनी नावनोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत, तर मयत व दुबार नोंद असलेल्या ६५८ जणांची नावे कमी केली जाणार आहेत. नाव, वय, पत्ता आदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी २७११ अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघात २ लाख ४१ हजार २५२ मतदार असून त्यातून मयत व दुबार नोंद झालेले ६५८ मतदार कमी होणार आहेत. तर तब्बल १४,९३३ नवीन मतदार वाढणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अंतिमत: २ लाख ५५ हजार ५२७ मतदार राहतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
गुहागर विधानसभा
या मतदारसंघात खेड, गुहागर व चिपळूण तालुक्यांचा समावेश असून एकूण १३ हजार ०१३ नवीन मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर मयत व दुबार नोंदणी झालेल्या ७११ जणांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच नाव, पत्ता, वय आदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी २,७५३ अर्ज आले आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ०९ हजार ८१९ मतदार असून त्यातून मयत व दुबार नोंदणी झालेल्या ७११ जणांची नावे कमी होणार आहेत. तर १३,०१३ नवीन मतदार वाढणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अंतिम यादीत २ लाख २२ हजार १२१ मतदार राहतील, असा अंदाज आहे.
चिपळूण विधानसभा
या मतदारसंघात चिपळूण व संगमेश्वरचा समावेश असून येथील १२ हजार ५८१ नवीन मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. तर मयत व दुबार नोंदणी झालेल्या ७२९ जणांची नावे कमी केली जाणार आहेत. याशिवाय नाव, पत्ता, वय आदींमध्ये बदल करण्यासाठी २ हजार ३८२ अर्ज आले आहेत. एकूण २ लाख ३१ हजार ३५९ मतदारांमधून मयत व दुबार नोंद असलेल्या ७२९ जणांची नावे नावे कमी होणार आहेत. तर १२ हजार ५८१ नवीन मतदारांची भर पडून या मतदारसंघाची मतदार संख्या २ लाख ४३ हजार २११ एवढी होणार आहे.
रत्नागिरी विधानसभा
या मतदारसंघात रत्नागिरी, संगमेश्वरचा समावेश असून एकूण १४ हजार २२७ नवीन मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर मयत, दुबार नोंदणी झालेल्या १,२५९ जणांची नावे कमी केली जाणार आहेत. नाव, वय, पत्ता दुरुस्तीसाठी ३,०५८ अर्ज आले आहेत. या मतदारसंघात एकूण २ लाख ४२ हजार ८६५ मतदार असून त्यातून मयत व दुबार नोंदणी झालेल्या १,२५९ जणांची नावे कमी केली जाणार आहेत. तर १४ हजार २२७ नवीन मतदारांची भर पडून अंतिम यादीमध्ये २ लाख ५५ हजार ८३३ मतदार राहणार आहेत.
राजापूर विधानसभा
या मतदारसंघात राजापूर, लांजा व संगमेश्वरचा समावेश असून येथील १२ हजार ४४७ नवीन मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर मयत व दुबार नोंद झालेल्यांची संख्या १,०२२ आहे. तसेच नाव, पत्ता, वय आदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी २,२५८ अर्ज दाखल झाले आहेत. या मतदारसंघात २ लाख १५ हजार ६६४ मतदार असून त्यातून १,०२२ (मयत व दुबार नोंदलेले) जणांची नावे कमी होणार आहेत. तर १२ हजार ४४७ नवीन मतदारांची भर पडून या मतदारसंघात एकूण २ लाख २७ हजार ०८९ मतदार राहतील, असा प्राथमिक अंदाज आहे.
एकूणच जिल्ह्य़ात ६७ हजार २०१ नवीन मतदार वाढणार असल्याने हे नव्या दमाचे तरुण मतदार आपले पहिले-वहिले मत कोणाच्या पारडय़ात टाकतात, याकडे राजकीय पक्षासह सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे.

transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत