Shiv Sangram Chief Vinayak Mete Death शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, मेटेंचा अपघात नेमका कसा आणि कोणामुळे झाला याबाबत पोलिसांचे ८ पथक तपास करत आहेत. लवकरच सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

हेही वाचा- “त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख

Milind narvekar to join bjp?
पुढील लक्ष्य मिलिंद नार्वेकर! ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून खास रणनीती?
CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
thackeray group leader sanjay jadhav on cm eknath shinde
संजय जाधवांनी महायुतीविरोधात थोपटले दंड; म्हणाले, “उद्धव ठाकरे कसलेले पैलवान तर मुख्यमंत्र्यांची अवस्था…”

पोलिसांकडून तपास सुरू

एका मोठ्या ट्रकने विनायक मोटेंच्या गाडीला पाठीमागून धडक दिली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघातानंतर ट्रक निघून गेला. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम करण्यात येत असून तपासानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील, असेही दुधे म्हणाले.

मुख्यमंत्र्याचे चौकशीचे आदेश

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याने घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात माहिती तपासली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. “आरोपांच्या बाबतीतील माहिती तपासून घेतली जाईल. पण ही झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

हेही वाचा- विनायक मेटेंचा अपघात की घातपात? ‘मराठा क्रांती मोर्चा’चा सवाल, अपघातानंतरच्या घडामोडींवर व्यक्त केला संशय!

विनायक मेटेंच्या अपघाताला केंद्र आणि राज्य सरकार जबबादार

जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे,” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

हेही वाचा- विनायक मेटे यांचं निधन हे महाराष्ट्राचं नुकसान; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली हळहळ

कारचालकाची डुलकी कारणीभूत

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अपघातासाठी त्यांच्या कारचालकाची डुलकी कारणीभूत ठरली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.