संचारबंदीत गावाकडे परतणाऱ्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड मजुरांना पोलिसांनी मारहाण केल्याची समजताच भाजपा आमदार सुरेश धस यांनी बुधवारी रात्रीच खेड येथे जाऊन ठिय्या मांडला. पोलिसांची भूमिका आणि सरकारचे धोरण याविषयी टीकाही केली. त्यामुळे जिल्हाबंदी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आमदार धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र इतर जिल्ह्यात कामासाठी तसेच ऊस तोडणीसाठी गेलेले नागरिक परत येत आहेत. बुधवारी रात्री परजिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना त्यांना खेड व भिगवण ( ता.कर्जत जि.अहमदनर) येथे जिल्ह्याच्या हद्दीत रोखून पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. ही घटना कळतात भाजपा आमदार सुरेश धस यांनी रात्रीच तात्काळ खेड येथे जाऊन ऊसतोड मजुरांची भेट घेतली पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रात्री दोन वाजता त्यांनी ठिया आंदोलनही केले. शिवाय पोलिसांचीची भूमिका आणि सरकारच्या धोरणावरही त्यांनी टिका केली.जिल्हा बंदीचे आदेश डावलून ऊसतोड मजुरांची भेट घेऊन ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी शुक्रवारी पोलीस नाईक प्रशांत क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against bjp mla suresh dhas msr87
First published on: 03-04-2020 at 19:41 IST