सुनेने स्वयंपाक व्यवस्थित न केल्याने नाराज झालेल्या सासऱ्याने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. कृष्णा आपली पत्नी रेखा आणि वडिल शांताराम उज्जैनकर यांच्यासोबत विठ्ठलवाडी येथील शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी शांताराम यांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कामावर असताना रेखाने सासरे शांताराम यांना जेवण वाढलं होतं. पण जेवण न आवडल्याने शांताराम यांनी ते गटारात फेकून दिलं. कृष्णा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या वडिलांनी सुनेसोबत झालेल्या भांडणाबद्दल सांगितलं. यानंतर कृष्णाने पत्नीला मारहाण केली.

जेवण झाल्यानंतर कृष्णा शतपावली करण्यासाठी घराबाहेर गेला. यावेळी पुन्हा एकदा सासरे आणि सुनेत भांडण सुरु झालं. यावेळी शांताराम यांनी सुनेला मारहाण केली. कृष्णा याने वडिल पत्नीला मारहाण करत असल्याचं पाहिलं आणि ते थांबवण्याचा प्रयत्न केला. माझ्या पत्नीला मारहाण करु नका असं कृष्णा वडिलांना सांगत होता. पण यामुळे संतापलेल्या वडिलांनी कृष्णाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A father killed his son over fight with daughter in law
First published on: 22-05-2018 at 13:11 IST