विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. अंबड पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला आणि अजून एका आरोपीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडगाव येथील आरोपी महिला शीतल उघडे तिच्या भावाच्या उपचारासाठी अंबड येथे दवाखान्यात आली होती. तिच्यासोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्यदेखील होता. भावाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर औषध घेण्यासाठी ती दवाखान्याबाहेर आली. यावेळी तिने मुलाला एका ठिकाणी थांबवण्याचा बहाणा करत प्रियकर नवनाथ जगधनेच्या स्वाधीन केलं. यावेळी तिने प्रियकर अनोळखी व्यक्ती असल्याचं नाटक केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman killed son with help of boyfriend in jalna sgy
First published on: 16-09-2021 at 16:15 IST