पुणे :पुणे शहरातील महात्मा मंडई जवळील मेट्रो स्टेशनसमोरील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये अनैसर्गिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा रागातून तरुणाने एका व्यक्तीचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली.याप्रकरणी आरोपी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. कातरड, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे.तर या प्रकरणातील खून झालेल्या मयतची ओळख अद्यापपर्यन्त पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई जवळील परिसरात मेट्रो स्टेशनजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी शहराच्या विविध भागात आमच्या टीम रवाना करण्यात आल्या होत्या.
तर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे २४ तासाच्या आतामध्ये आरोपी रमेश प्रकाश सत्रे याच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले आहे.
या आरोपीला शिरुर येथून अटक करण्यात आली असून अनैसर्गिक संबंधाना नकार दिल्याने मयत आणि आरोपी या दोघांमध्ये वाद झाला.त्यामध्ये आरोपी रमेश प्रकाश सत्रे याने त्याचा खून केल्याची कबुली तपासात दिली असल्याचे त्यांनी सांगितले.