scorecardresearch

“अब्दुल सत्तारांना रात्रीचं जास्त दिसतं, म्हणून…” जितेंद्र आव्हाडांचा कृषीमंत्र्यांना उपरोधिक टोला

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल निफाड तालुक्यात रात्रीच्या वेळी शेतीच्या नुकसानाची पाहाणी केली. यावरून आता ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.

jitendra awhad vs abdul sattar
अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या वेळी शेतीच्या नुकसानाची पाहाणी केली.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे शेतकरी सरकारकडे भरपाईची मागणी करत आहेत. तसेच मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची अद्याप पाहाणी केली नसल्याचा आरोप केला जात आहे. प्रामुख्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर विरोधकांकडून टीका सुरू होती. अशातच आता कृषीमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे पाहाणी दौरे सुरू केले आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी (२१ मार्च) नाशिकच्या निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाच्या पाहाणीसाठी जाणार होते. कृषीमंत्री येणार म्हणून शेतकऱ्यांनीदेखील गर्दी केली होती. परंतु दुपारी येणारे कृषीमंत्री रात्री पोहोचले. त्यानंतर त्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली. परंतु या पाहणी दौऱ्यानंतर सत्तार यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

अब्दुल सत्तारांना रात्रीचं जास्त दिसतं : जितेंद्र आव्हाड

कृषीमंत्र्यांच्या रात्रीच्या पाहणी दौऱ्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. कृषीमंत्र्यांच्या रात्रीच्या पाहणी दौऱ्याबद्दल टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधींनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना सवाल केल्यानंतर आव्हाड म्हणाले की, “त्यांना (सत्तारांना) रात्रीचं दिसतं हे तुम्हाला माहित नाही का? त्यांना रात्रीचंच फार दिसतं.”

हे ही वाचा >> “आता तरी माझं ऐकाल का?” छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “त्यांनी मला…”

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आपण भाग्यवान आहोत की, रात्रीचं दिसणारा माणूस हा महाराष्ट्राचा कृषीमंत्री आहे. दिवसा नाही दिसलं तरी चालेल, कारण रात्रच महत्त्वाची असते. हास्यास्पद आहे हे सगळं. अजून हे नेते शेतकऱ्यांचा बांधावर गेले नाहीत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांन एक रुपयादेखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कोणी विचारत नाहीये.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:27 IST

संबंधित बातम्या