विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असले तरीही सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. मात्र आता ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत बिचुकलेंनी वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता बिचुकलेंनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकलेंनी या पत्रात म्हटले आहे.

पत्रात काय म्हटले आहे?
अभिजीत बिचुकले या पत्रात म्हणतात की, ”मी स्वत: गेली २० वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०१९ साठी मी १८२ वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ”

sanjay raut
“आम्हाला त्या मतदारसंघात…”, उमेदवाराचं नाव पाहून संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार; नेमकं प्रकरण काय
former leader of the opposition Dattatraya Waghere withdrawal nomination form
मावळमध्ये ठाकरे गटात बंडखोरी? माजी विरोधी पक्षनेत्याने घेतला उमेदवारी अर्ज
Lok Sabha election 2024 Heavy marching in North Nagpur Predominance of Congress and BJP is also ready
रणसंग्राम लोकसभेचा : उत्तर नागपुरात जोरदार मोर्चेबांधणी; काँग्रेसचे प्राबल्य, भाजपही सज्ज!
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

”त्याचबरोबर या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रीमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे”, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे.