राज्यात आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बालसिंग चहल यांना नुकतंच हटवण्यात आलं आहे. ही जागाही रिक्त आहे. परंतु, अद्याप या जागेवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या आश्विनी भिडे यांचीही बदली करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तिथून त्यांची बदली आता मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे. तर, मेट्रो वुमेन म्हणून ओळख असलेल्या आश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालपदी बदली करण्यात आली आहे. आश्विनी भिडे या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होत्या. त्यांच्या जागी आता अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijit bangar as additional commissioner of mumbai municipality ashwini bhide also transferred to this post sgk
First published on: 19-03-2024 at 22:08 IST