अग्निप्रतिबंधक उपकरणे न बसविल्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या परवाना विभागाने रंकाळय़ाजवळील ‘डी मार्ट’ला सील ठोकले आहे. डी मार्टने अग्निशमन उपकरणे बसवावीत यासाठी महापालिकेने नोटीस दिली होती. पण त्याबाबत डी मार्टकडून कोणतीही हालचाल न झाल्याने गुरुवारी सकाळी परवाना विभागाचे अधिकारी कारंडे यांच्या पथकाने डी मार्ट सील केले. याचप्रमाणे महाद्वार रोडवरील काही दुकानांच्यावरही कारवाई सुरू करण्यात आली आहे, यासाठी विभागाचे कर्मचा-यांचे पथक कार्यरत केले आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action about safety equipment not being installed
First published on: 25-07-2014 at 03:36 IST