सातारा : सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर घाट (ता. सातारा) येथे माकड या वन्य प्राण्यास खाद्यपदार्थ दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीचा जबाब नोंदवला आहे. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.

सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर घाट रस्त्यावर अनेक माकडे फिरत असतात. कासला जाणारे-येणारे पर्यटक या माकडांना वाटेत थांबून आपल्याकडील खाऊ देतात. यामध्ये फळे, अन्नापासून ते पॅकबंद पिशव्यांमधील तयार पदार्थांपर्यंत अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. वन्यजीवांना असे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ घालण्यावर कायद्याने बंदी आहे. अशा सवयींमुळे वन्य प्राण्यांमधील स्वत:चे अन्न स्वत: शोधून जगण्याची नैसर्गिक शक्ती हळूहळू नष्ट होत जाते. तसेच या तयार पदार्थांमुळे तसेच त्यासोबतच्या प्लास्टिक आवरण, पिशव्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. यामुळेच कुठल्याही वन्य जीवांना अन्न देण्यास कायद्याने गुन्हा आहे. आज दुपारी वेळे कामथी (ता. सातारा)येथील एका पर्यटकाने या माकडांना केळी खाऊ घातली. यामुळे या व्यक्तीवर करवाई केल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

सातारा कास रस्त्यावर यवतेश्वर घाट (ता. सातारा) येथे ही कारवाई करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीचा जबाब नोंदवला आहे. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.वन्यजीवांना असे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ घातल्यास त्यांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. तसेच त्यांची स्वत:चे अन्न स्वत: शोधून जगण्याची नैसर्गिक शक्ती हळूहळू नष्ट होत जाते. यामुळे वन्यजीवांना असे खाद्यपदार्थ खाऊ घालू नका असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपाल सातारा सुनील शिंदे, वनरक्षक सातारा मुकेश राऊळकर व इतर वनमजूर यांनी केली.

वन्यजीवांना असे बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ घालण्यावर कायद्याने बंदी आहे. अशा सवयींमुळे वन्य प्राण्यांमधील स्वत:चे अन्न स्वत: शोधून जगण्याची नैसर्गिक शक्ती हळूहळू नष्ट होत जाते. तसेच या तयार पदार्थांमुळे तसेच त्यासोबतच्या प्लास्टिक आवरण, पिशव्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. यामुळेच कुठल्याही वन्यजीवांना अन्न देण्यास कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, सातारा