सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची अत्यल्प अवधीत अहमदनगर येथे अपर जिल्हाधिकारीपदावर तडकाफडकी बदली झाली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सोलापुरात अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
भोसले यांनी सोलापुरात रुजू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून सेवा बजावली होती. सोलापुरात अपर जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी त्यांनी नेटकेपणाने सांभाळली असतानाच त्यांची अचानकपणे नगरला बदली झाल्याने प्रशासकीय यंत्रणेत हा चर्चेचा विषय ठरला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी म्हणून भोसले यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली होती. या अगोदरचे अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे हे तीन वर्षे कार्यरत असताना काही प्रकरणात ते वादग्रस्त ठरले होते. या पाश्र्वभूमीवर भोसले हे प्रशासनाची घडी बसविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतानाच त्यांची बदली झाली आहे. नवीन अपर जिल्हाधिकारी कोण येणार, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
अपर जिल्हाधिका-याची नगरला अचानक बदली
सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची अत्यल्प अवधीत अहमदनगर येथे अपर जिल्हाधिकारीपदावर तडकाफडकी बदली झाली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सोलापुरात अपर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
First published on: 06-06-2014 at 03:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional collectors suddenly transfer to nagar