शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह वादानंतर आता निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाचा दावा, पक्षचिन्ह कुणाचं यावर सुनावणी होत आहे. या पार्श्वूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावर भाष्य केलं. ते गुरुवारी (९ नोव्हेंबर) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

उज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. परंतु या स्वायत्त संस्थेविषयी जनमानसात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षांचं अधिकृत निवडणूक चिन्ह कुणाला द्यावे हा निर्णय घेताना त्या राजकीय पक्षात फूट पडली आहे का? हे पाहिलं जातं.”

“सुनावणीत पक्षाची घटना आणि निवडून आलेले प्रतिनिधी हे महत्त्वाचे मुद्दे”

“आता हे नाकारता येणार नाही की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. म्हणून या पक्षातील दोन गट पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करत आहेत. या सुनावणीत पक्षाची घटना आणि निवडून आलेले प्रतिनिधी हे महत्त्वाचे मुद्दे असतील. निकाल काय लागेल याचा अंदाज करता येत नसला तरी शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचाच कित्ता गिरवला जातो, की निवडणूक आयोगाकडे आणखी वेळ मागितला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल,” असं मत उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.

“अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत दिसत असले, तरी…”

उज्वल निकम पुढे म्हणाले, “अशा प्रकरणात निवडणूक आयोग प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार करत असतं. पक्षाच्या घटनेनुसार संघटना कुणाच्या ताब्यात आहे आणि त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे बहुमत कुणाकडे आहे या त्या दोन गोष्टी आहेत. आज अजित पवार यांच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत दिसत असले, तरी त्याबाबतची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल झाली आहेत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल का?

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल का? यावर उज्वल निकम म्हणाले, “शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाचा निर्णय होईल का? या प्रश्नावर उज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोग निकाल कोणत्या बाजूने देईल हे सांगणे अवघड आहे. “