नगरः श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मुरकुटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूरमधील राहत्या घरातून अटक केली. तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे. या महिलेने काल, सोमवारी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – रायगडात लाखभर लाडक्या बहिणींची आधार जोडणी अभावी कोंडी

हेही वाचा – Gulabrao Patil : “आम्ही नवरदेवाकडून होतो आणि भाजपावाले आता..”, गुलाबराव पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात. श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती.