नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली आहे. २०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने मुख्य आरोपी सचिन गोलेकर याच्यासह ९ आरोपींची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. गावातील वरच्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीनच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नितीन आगे हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahmednagar kharda nitin age murder case all suspects acquitted due to lack of evidence
First published on: 23-11-2017 at 18:52 IST