आमच्याकडे एका मोठ्या पक्षाचे नेते आले होते. त्यांच्यासोबत दुसरे नेतेही आले आणि त्यांनी आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं मग आम्ही राष्ट्रपती राजवट का उठवू नको? राजकारणात एका क्षणात गोष्टी बदलतात मग एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठली तर त्यात नवल काय? असं माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. तसंच पहाटेच्या शपथविधीबाबत खुलासाही केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोटही केला आहे.

काय म्हटलं आहे भगतसिंह कोश्यारी यांनी?

दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. सरकार जे स्थापन करणार असतात ते बोलवत असतात. मी ज्यांना शपथ दिली त्यांनी याबाबतचं सत्य सांगितलं आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

शरद पवारांना शपथविधीची माहिती होती का?

शरद पवारांना या शपथविधीची माहिती होती का? असं विचारलं असता भगतसिंह कोश्यारी म्हणाले की शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर आणि तर ची भाषा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीविषयी करत असेल तर हायकोर्टात त्यांचं जे लवासाचं प्रकरण आहे त्यावर त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल. शरद पवारांचा मी खूप आदर करतो. माझ्या हस्ते त्यांना दोनवेळा डी. लिट ही पदवी माझ्या हस्ते प्रदान केली आहे. तरीही ते असं म्हणत असतील तर ते राजकीय बोलत आहेत असंही कोश्यारी यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

तुमच्यावर त्यावेळी कुणाचा दबाव होता का?

नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. त्यांनी मला वेळ मागितला त्यानंतर मी त्यांना वेळ दिला. मग काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही वेळ दिली तर आमदारांचा घोडेबाजार होईल. त्यानंतर मी बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी कमी केला. या सगळ्यात माझी भूमिका संदिग्ध कशी काय? असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे. सकाळी ८ वाजता शपथविधी झाला तरीही लोक त्याला लोकं पहाटेचा शपथविधी म्हणत आहेत. याला काय अर्थ आहे असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे?

जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार आहे तिथे राज्यपाल विरूद्ध सरकार असा सामना बघायला मिळतो असं का घडतं हे विचारलं असता कोश्यारी म्हणाले मी पत्र लिहिलं होतं मंदिरांबाबत त्यावेळी मला वाटलं ती भूमिका मांडली. त्यावर गृहमंत्र्यांनी वक्तव्य केलं आणि मी शांत राहिलो त्यात काय चर्चा करायची? असंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.