scorecardresearch

Premium

“तक्रार करताना अजित पवार रडले, असं…”, अमित शाहांबरोबरच्या भेटीबाबत काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं मोठं विधान केलं आहे.

ajit pawar crying
अजित पवार (संग्रहित फोटो-एएनआय)

महायुतीत सामील झाल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही बोललं जात आहे. शिंदे गटाला अधिक विकास निधी दिला जातो तर अजित पवार गटाला तुलनेनं कमी विकास निधी दिला जातो, अशी तक्रार अजित पवारांनी अमित शाहांकडे केल्याचं समजत आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अमित शाहांकडे तक्रार करता करता अजित पवार रडले. पण त्यांना तक्रारीपुरतं मर्यादीत ठेवा, ते रडून आले, असं कुठेही सांगू नका, असं मला कुणीतरी सांगितलं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. ते नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

congress leaders, remembering Vilasrao deshmukh
‘साहेब’ तुम्ही हवे होतात…पडझडीच्या काळात काँग्रेस नेत्यांना विलासरावांची आठवण
Electoral Bonds Case
निवडणूक रोखे योजनेविरुद्ध दंड थोपटणारी काँग्रेसची ‘ती’ रणरागिणी कोण?; शेवटपर्यंत दिला न्यायालयीन लढा!
nirmala sitharaman budget speech
काँग्रेसच्या ‘फोन बँकिंग’मुळे सरकारी बँका कर्जाच्या खाईत; श्वेतपत्रिकेवरील चर्चेत सीतारामन यांचा काँग्रेसवर घणाघाती हल्लाबोल
karti chidambaram
कार्ती चिदंबरम यांना शिवगंगा मतदारसंघातून हटवण्याची मोहीम; अनेक नेते नाराज, तमिळनाडू काँग्रेसमध्येही पडणार फूट?

हेही वाचा- “…तर शिंदे गट अडचणीत येईल”, राहुल नार्वेकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचं सूचक विधान

अजित पवारांच्या नाराजीबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले, “अजित पवार कधी खूश राहिले, ते नेहमीच नाराज असतात. त्यांच्या मनाप्रमाणे झाले, तर ते खूश होतात. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. ‘हम करे सो कायदा’अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते. आता तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं की, निधी मिळत नाही. अरे तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे, मग तुम्ही दुसऱ्यांकडे तक्रार का करता? आता तुमची धमक दाखवा.”

हेही वाचा- “दादांचा चेहरा पाहिला तरी…”, अजित पवारांच्या नाराजीवर रोहित पवारांचं विधान

“मला कुणीतरी सांगितलं की, अजित पवार तक्रार करता करता रडले असं कुठे सांगू नका. त्यांना तक्रारीपुरतंच मर्यादित ठेवा. दादा रडून आले वगैरे, असं कुठे सांगू नका. आता कदाचित अजित पवारांवर रडण्याची स्थिती आली असावी. कारण भारतीय जनता पार्टीत जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात. आता अजित पवारांवर सडण्याची आणि रडण्याची स्थिती आली असावी,” असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar cried while complaining to amit shaha vijay wadettivar statement rmm

First published on: 13-11-2023 at 17:15 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×