राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. सध्या शिंदे-फडणवीस हे दोघेच राज्याचे सर्वेसर्वा असून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. याच कारणामुळे विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य केले जात असून लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करुन जनहिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार का गरजेचा आहे, याबाबत सविस्तर सांगितलं आहे. पालकमंत्री नेमणं, त्यांच्यावर जबाबदारी टाकणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

हेही वाचा >>> शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई!

“त्यांना बहुमत मिळालेलं आहे. त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेचे अध्यक्ष नेमले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवण्याला काय अर्थ आहे? सध्या सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे पालकमंत्री तातडीने नेमणे दरजेचे आहे. त्यांच्यावर जबाबदारी टाकावी. पालकमंत्र्यांनी तेथील सरकारी यंत्रणेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. जीवितहानी किंवा वाहतुकीचा खोळंबा होत असेल तर तातडीने पावलं उचलण्याची गरज असते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राहिलेल्या मंत्रिमंडळाचा ताबडतोब विस्तार करावा, अशी माझी राज्यातील जनतेच्या वतीने विनंती आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आणि महत्त्व सांगितले.

हेही वाचा >>> “राज्य दोघांच्या भरवश्यावर अन् जनता वाऱ्यावर”; एकनाथ खडसेंचा राज्यसरकारवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतरच शिंदे सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना आषाढी एकादशी झाल्यानंतर मुंबईत भेटून यावर चर्चा करू आणि मंत्रिमंडळ विस्ताराविषयी निर्णय घेऊ. १८ जुलै रोजी तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. पावसाळी अधिवेशनाच्या आधी शपथविधी होणार आहेत,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे अद्याप तरी राज्याला पूर्ण मंत्री असेलेले सरकार कधी मिळणार हे अनिश्चितच आहे.