महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं म्हटल्यानंतर हे सगळेजण टुणकन भाजपाबरोबर गेले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांचं बऱ्यापैकी आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं आहे. त्यांनी मिमिक्री करण्यापेक्षा आपलं पक्षसंघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

pune, case registered, Former Minister Balasaheb Shivarkar, House Grabbing, dhananjay pingale, police, pune news, pune House Grabbing case, marathi news,
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Udayanraje Bhosale
“…तेव्हापासून कॉलर उडवण्याची स्टाईल सुरू झाली”, उदयनराजे भोसलेंनी सांगितला यात्रेतला किस्सा
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार

हेही वाचा- “मोदींविरुद्ध आगपाखड करणारी व्यक्ती…”, अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारलं असता सुनील तटकरे म्हणाले, “राज ठाकरे यांनी आपलं बऱ्यापैकी आयुष्य मिमिक्री करण्यात घालवलं आहे. कुठल्याही पक्षाच्या मागे लोकांची किती ताकद उभी राहते, यावरून राजकारणातलं यश मोजलं जातं. अजित पवारांनी गेल्या ३५ वर्षांत निवडणुका लढवत, पक्ष संघटना मजबूत करत, उत्तम पद्धतीचं प्रशासन दिलं आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकसंग्रह वाढवला आहे. त्यामुळे मला वाटतं की, राज ठाकरेंनी मिमिक्री करण्यापेक्षा आपल्या पक्षाचं संघटन कसं मजबूत करता येईल? यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं.”

हेही वाचा- “कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे…”, शरद पवारांच्या बीडमधील सभेवरून धनंजय मुंडेंचा सूचक इशारा

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत (तुरुंगात) काय काय असतं? जाऊ नका… आपण हवं तर इथे (भाजपाबरोबर) जाऊ पण तिथे (तुरुंगात) नको.