राज्यात महायुतीमध्ये एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. या १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. १५ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी १४ जानेवारीला मेळावे घेण्यात आले. नाशिकच्या महामेळाव्यात नरहरी झिरवाळ यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

“माझ्याकडे अजित दादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. अनेकांना कल्पना असेल, सगळ्यांचं घड्याळ मागे-पुढे होईल, पण अजित दादांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही. देवेंद्र फडणवीसही वेळ पाळतात. शिंदेंना कधी कधी उशीर होतो, पण ते सॉरी म्हणतात”, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील समाविष्ट भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, प्रहारसह इतर प्रमुख पक्ष तयार आहेत. संख्यात्मकसह आमची भाविकदृष्ट्या देखील युती झाली आहे. युतीमध्ये सामील झालेल्या विविध पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांचा समन्वय वाढण्यासाठी १४ जानेवारी रोजी समन्वय मेळावे आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅनरवरील फोटोंसाठी प्रोटोकॉल असावा

फार मोठ्या चुका होऊ नयेत म्हणून महायुतीनेच आता फोटोंसाठी प्रोटोकॉल ठरवून द्यावा. कोणते फोटो कुठे टाकावेत याबाबत नियम बनवले पाहिजे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले. तसंच, आजच्या बॅनरवर माझाही कुठेतरी फोटो असायला पाहिजे होता, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या या मेळाव्याला छगन भुजबळ अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.